| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील पत्रकार सचिन पावशे यांचे वडील गौऱ्या विठ्ठल पावशे यांचे शुक्रवारी (दि.27) वृद्धपकाळाने निधन झाले. निधनासमयी ते 87 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा संदीप पावशे हे अलिबाग को. ऑपरेटिव्ह बँकमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. गौऱ्या पावशे हे अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव येथील मच्छिमार सोसायटीचे माजी चेअरमन होते. त्यांनी सोसायटीचे चेअरमन म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच, ते शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत व शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. नवगावमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आदी क्षेत्रासह मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. गौऱ्या पावशे यांचे उत्तरकार्य मंगळवार दि.7 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी सकाळी 9.00 वाजता होणार असल्याची माहिती पावशे कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.







