सचिन राऊळ यांना डॉक्टरेट

। अलिबाग । प्रतिनिधी ।

येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शरद राऊळ यांना त्यांनी केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापिठाकडून समाजकार्यासाठी डॉक्टरेट पदवी प्रधान करण्यात आली. नाशिक येथील प.सा. नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे यांच्या हस्ते सचिन राऊळ यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली.

यावेळी नवी दिल्ली येथील इप्कोच्या संचालिका साधनाताई जाधव, छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापिठाचे महासंचालक डॉ. मंगेश देशमुख, चेन्नई येथील एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊन्डेशनचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. परशुरामन आदी मान्यवर उपस्थित होते.

अलिबाग तालुक्यताील नागाव येथील सचिन राऊळ हे अनेक वर्षे निस्वार्थीवृत्तीने समाजकार्य करीत आहेत. घरातून कोणतीही राजकीय व सामाजिक पार्श्‍वभूमी नसताना सचिन यांनी आपल्या स्वकतृत्वावर समाजात नावलौकीक मिळविला आहे, तो त्यांच्या समाजाप्रती असलेल्या प्रेमामुळे. त्यांच्या निर्मल व्हिला येथे जाणारा प्रत्येक गरजवंत रिकाम्या हाताने कधीच परत जात नाही.

Exit mobile version