डॉक्टरांचा बंद तात्पुरता स्थगित

| मुंबई | प्रतिनिधी |

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून राज्यभर पुकारण्यात आलेला खासगी डॉक्टरांचा 24 तासांचा बंद इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने तात्पुरता स्थगित केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द करून त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर न्यायालयाच्या आवाहनाचा मान राखत आयएमएने बंद मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे सोमवारी राज्यभर खासगी रुग्णसेवा पूर्ववत सुरू राहणार आहे. मात्र, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा लागू करावा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाबाबत अध्यादेश काढावा आणि इतर प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आयएमएची मागणी आहे. अन्यथा 9 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Exit mobile version