पैसा यांच्या बापाचा आहे का?- विजय वडेट्टीवार

| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |

आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून 1500 परत घेण्यात येतील, असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीनं जोरदार पलटवार केला आहे. रवी राणा हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातले बोलले, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी वडेट्टीवारांनी केले आहे. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे? यांची नीती दिसली. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली आहे. रवी राणा जे बोलला, ते सरकारच्या शिंदेच्या मनातील, फडणवीस आणि अजित पवार यांच्या मनातील बोलले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केसा आहे. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी… आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मतं विकतील का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान, बहिणींचा अपमान आहे. ही योजना मतांसाठी आणली होती. सरकारने राज्यातील बहिणीची माफी मागितली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Exit mobile version