डोंबिवली स्फोट प्रकरण : अमुदान कंपनीच्या मालकाला अटक; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

। डोंबिवली । प्रतिनिधी ।

डोंबिवलीत झालेल्या स्फोटानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी शहरातील मेहेरधाम परिसरातील पेठ रोड येथून ताब्यात घेतले आहे. सूनेच्या भावाकडे त्या अटक टाळण्यासाठी लपून बसल्या होत्या. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून बॉयलर स्फोटप्रकरणी त्यांच्यासह मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर अमुदान कंपनीचे मालक फरार झाले होते. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी तपासले. ते नाशिक येथे असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार ठाणे पोलिसांचे पथक नाशिक पोलिसांच्या संपर्कात होते. डोंबिवलीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता. त्यांच्या अटकेची माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिेष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. वैद्यकीय तपासणी करून मालती मेहता यांना ठाणे पोलिसांकडे सोपविण्यात आले.

Exit mobile version