म्हसळा आरक्षणात महिलांचे वर्चस्व

17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव
। म्हसळा । वार्ताहर ।
आगामी म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण सोडत सोमवारी (दि.15) रोजी म्हसळा कन्या शाळा हॉलमध्ये चिठ्ठीद्वारे काढण्यात आली.
महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यात सर्वसाधारण गटातून पाच महिला, अनु. जामातीतील एक, अनुसुचित जातीतील एक महिला, ओबीसी (ना.मा.प्र) गटातून दोन महिला अशा महिलांसाठी नऊ जागा राखीव आहेत.त्यामुळे भविष्यात नगर पंचायतीमध्ये महिला राज असणार आहे. यावेळी श्रीवर्धनचे प्रांताधिकारी अमित शेडगे पिठासन अधिकारी होते. तहसीलदार समीर घारे, म्हसळा नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज उर्कीडे, नायब तहसीलदार के.टी.भिंगारे, सुरेश कुडेकर, संजय कर्णिक, संजय खताते, करण गायकवाड, चंद्रकांत कापरे, सुहेब हळदे, बाबाजान पठाण, अशी विविध राजकीय आणि बहुतांश पत्रकार मंडळी उपस्थित होती.
म्हसळा पंचायतीच्या एकूण 17 प्रभागांपैकी प्रभाग क्र.1 अनुसुचित जमाती महिला, प्रभाग 2 ना.मा.प्र. महिला, प्रभाग 3 सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 अनुसुचित जाती महिला, प्रभाग 5 सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 सर्वसाधारण, प्रभाग 7 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 9 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग 10 सर्वसाधारण, प्रभाग 11 सर्वसाधारण महिला, प्रभाग 12 सर्वसाधारण, प्रभाग 13 सर्वसाधारण महिला, प्रभाग 14 सर्वसाधारण, प्रभाग 15 सर्वसाधारण महिला, प्रभाग 16 सर्वसाधारण, प्रभाग 17 सर्वसाधारण असे घोषित करण्यात आले आहे.

Exit mobile version