| म्हसळा | प्रतिनिधी |
शिवनेरी महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हसळा तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. सभेच्या प्रमुख जिल्हा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे होत्या. तर अध्यक्षस्थानी प्रभाग संघाच्या अध्यक्षा यशोदा कांबळे होत्या. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी माधव जाधव, महसूल नायब तहसीलदार मृणालिनी शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय शिंदे, जिल्हा अभियान व्यवस्थापक शिरीष पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक रोहिणी निलेकर-पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी रेणुका पाटील, उपअभियंता संजय सूर्यवंशी, उप कृषी अधिकारी संजय शिंदे, आरडीसीसी बँकेचे व्यवस्थापक मंगेश मुंडे, विस्तार अधिकारी अजय खराडे आणि इतर मान्यवरांचा सहभाग होता. सभेत शिवनेरी महिला प्रभाग संघाच्या वर्षभरातील कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या प्रभागामध्ये 269 स्वयं-सहाय्यता बचत गट, 17 ग्रामसंघ आणि 14 समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने या सर्व घटकांचे कार्य अत्यंत मोलाचे ठरत आहे. तर बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक उज्वल प्रवास सुरु असल्याचे जिल्हा प्रकल्प संचालिका प्रियदर्शिनी मोरे यांनी सांगितले.





