। गुहागर । वार्ताहर ।
तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य विभागाच्यावतीने नुकतीच एक दिवशीय मॉक इंटरव्ह्यू स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास गुहागर पाटपन्हाळे येथील सुप्रसिद्ध खातू मसालेचे मालक शाळीग्राम खातू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतली आणि उत्कृष्ट कामगिरी केली याची विविध मान्यवरांनी आपल्या भाषणात दिलेली जी माहिती होती त्यांनी भारावून जाऊन श्री. खातू यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या कामांसाठी माझ्याकडून 50 हजार रुपयांची देणगी देत आहे, असे जाहीर केले होते. त्याची पूर्तता दोनच दिवसात श्री. खातू यांनी करताना 50 हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे सचिव सुधाकर चव्हाण यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी प्रभारी प्राचार्य प्रमोद देसाई, डॉ. सुभाष खोट, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, डॉ. शिंदे आणि कार्यालयीन प्रमुख सुधीर टानकर उपस्थित होते.