‌‘अमंली पदार्थांचे सेवन करू नका’: पोलीस अधिकारी सविता गर्जे

| म्हसळा | वार्ताहर |

मी स्वतः अंमली पदार्थ सेवन करणार नाही आणि असे पदार्थ सेवन करणाऱ्याला परावृत करेन. तसेच, अंमली पदार्थांची विक्री करणारी व्यक्ती माझ्या निदर्शनास आल्यास तत्परतेने त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देईन, अशी शपथ देत स्वतः व्यसनापासुन दूर राहण्याचे धडे उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी दिले. श्रीवर्धन येथील नाईक अंतुले महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्यासह म्हसळा तालुका पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. रायप्पा माशाले, प्रा. शिरीष समेळ, डॉ.संजय बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version