पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
| म्हसळा | प्रतिनिधी |
मुरुड येथील आरोपीने म्हसळा तालुक्यातील देवघर येथील एका सोळा वर्षीय मुलीला इंस्टाग्रामवर संपर्क साधून तो तिच्या घरापर्यंत पोचला. त्याने त्या मुलीला फिरायला जाण्यासाठी जबरदस्ती केली. ती त्याच्यासोबत जाण्यास तय्यार झाली नाही. त्यामुळे आरोपीने तिला दम दिला की, मी तुझ्या आईसह तुला देखील मारून टाकेन. त्यामुळे या भीती पोटी ती आरोपीसोबत फिरायला गेली. त्यानंतर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान जंगलात जाऊन तिच्यावरती आरोपीने अत्याचार केला. ही गोष्ट सायंकाळी तिच्या आईला समजतात आईने विचारणा केली असता तीने ही सगळी हकीगत सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आई-वडीलांनी त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, म्हसळा पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या सह त्यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी करून पीडित कुटुंबाला त्वरीत न्याय मिळवून दिल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे हे करीत आहेत.







