कोरोना संकट टळेपर्यंत निवडणुका नकोत

अजित पवारांचे आयोगाला आवाहन
। मुंबई । प्रतिनिधी ।
जोपर्यंत कोरोनाचं संकट टळत नाही, तोपर्यंत महापालिका निवडणुका घेऊ नयेत, असं एकमताने निवडणूक आयोगाला आवाहन केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाढत्या कोरोना रुग्णांबद्दल चिंता व्यक्त करून जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळावेत. मास्क आवश्य वापरावा. लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घ्यावेत. घरी राहून नवीन वर्षांचे स्वागत करा. एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, सगळीकडे उदघाटन आणि कार्यक्रम असतात. मात्र, प्रत्येक कार्यक्रमाला जाणे शक्य होत नाही. आम्ही बाहेर पडलो तरी चर्चा होते. नाही पडलो तरी चर्चा होते. मात्र, सध्या थंडी आहे. थंडीत कोरोनाचा संसर्ग वाढतो. मुंबईत रुग्ण वाढत आहेत. सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप राष्ट्रवादी सरकार स्थापनेबाबत मला बोलायचे नाही. मला जेव्हा बोलायचे आहे त्यावेळेस बोलेन. पक्षातील जेष्ठ व्यक्ती एकदा बोलल्यावर मी त्यावर काही बोलणार नाही.
अजित पवार,उपमुख्यमंत्री


तर सरकार बनले असते
देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीसाठी अजित पवारांना मी पाठवलं असं म्हणतात हे खरं आहे. पण मी पाठवलं असतं, तर तिथे राज्यच बनवलं असतं. असं अर्धवट काही काम केलं नसतं,असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. याच्यात काहीही अर्थ नाही. त्यात दुसर्‍या काही गोष्टी आहेत, असा सूचक उल्लेख पवारांनी यावेळी केला. मात्र, त्यात दुसर्‍या गोष्टी कोणत्या होत्या, हे काही त्यांनी सांगितलं नाही.

Exit mobile version