। मुंबई । वृत्तसंस्था ।
सध्या राजकारणात सुरु असलेल्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमध्ये नारायण राणेंनी सुशांतसिंग राजपूत व दिशा सालियन याची आत्महत्या नवे तर हत्या झाली असल्याचा नवीन मुद्दा उचलून धरला आहे.
“सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात काय? अशा किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका.” असे ट्विटही नारायण राणे यांनी केले आहे.
सुशांतसिंग राजपूत याची हत्या झाली, त्याच्या घराचे सीसीटीव्ही कुठं गायब झाले? 8 जूनला दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली, पण आत्महत्या झाल्याचं सांगण्यात आलं, दिशा सालियानचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट का आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची तिथल्या रजिस्टरची पानं का नाहीत? सुशांतसिंगला ज्यावेळी ते प्रकरण कळलं त्यावेळी त्याच्या घरात बाचाबाची झाली त्यातून सुशांतसिंग राजपूत याची हत्या झाली. त्या इमारतीचे सीसीटीव्ही गायब कसे झाले? 13 जूनला रात्री सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते? रुग्णालयात कसं नेलं? पुरावे कुणी नष्ट केले? ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली? मुंबईत आलेल्या तरुण कलाकाराची हत्या का झाली? रमेश मोरेची हत्या कुणी केली आणि का केली? याची चौकशी होणार व त्या प्रकरणातील अधिकारी सर्व उघड करतील असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.