डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उतरणार लोकसभेच्या आखाड्यात

| सांगली | प्रतिनिधी |

उमेदवारीसाठी सर्व पक्षांचा आग्रह आहे. लोकसभा निवडणूकलढवावी, अशी लोकांचीही मागणी आहे. तेव्हा ‌‘लोकसभा’ शंभर टक्के लढवणार असल्याचे सांगत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आगामी लोकसभेच्या आखाड्यासाठी शड्डू ठोकला. जिल्ह्यातील हजार युवकांसह दिल्लीत जाऊन सैनिकांसाठी रक्तदानाच्या संकल्पाची घोषणा करण्यासाठी ते काल (शनिवार) सांगलीत आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना गेली काही दिवस त्यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेवर स्पष्ट भाष्य केले. गेल्या काही महिन्यांत बैलगाडी स्पर्धा, गोवंश संवर्धन, देशातील सर्वांत मोठा तालीम आखाडा, एक लाख बाटल्या रक्तसंकलन अशा उपक्रमांतून चंद्रहार चर्चेत आहेत.

‌‘सर्वपक्षीय ऑफर’

कोणत्या पक्षातून लढणार या प्रश्नावर चंद्रहार यांनी देशात जेवढे पक्ष आहेत, त्या सर्वांची मला ऑफर आहे. जिल्ह्यात फिरताना लोकही माझ्याकडे लढण्याचा आग्रह करतात. वेळ आली की शंभर टक्के निर्णय घेऊ, असे उत्तर दिले.

Exit mobile version