डॉ.अरविंद मेहता यांचे निधन

। माणगाव । वार्ताहर ।
माणगावपासून दोन कि.मी. अंतरावर असणार्‍या निळगुण फाटा येथे बी. एस. एन. एल. टॉवरजवळ माणगाव-मोर्बा रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात माणगाव येथील डॉ.अरविंद मेहता यांना गंभीर दुखापती होऊन त्यांचा मृत्यू झाला. मेहता हे पायी चालत येत असताना त्यांना माणगाव-मोर्बा रस्त्यावर निळगुण फाटा याठिकाणी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातात यांच्या डोक्याला पायाला तसेच डाव्या डोळ्याला लहान मोठ्या स्वरुपाच्या दुखापती झाल्या. त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांना उपचाराकरिता मुंबई येथे हलविण्यात असता वाटेतच त्यांचे निधन झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनावरील चालक हा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलिस निरीक्षक आश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.वराळे हे करीत आहेत.

Exit mobile version