डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक

जय मल्हार संघाची बाजी

| अलिबाग | प्रतिनिधी |

गोविंदबंदर येथील नालंदा बुध्दविहार आयोजित मिलींद जाधव, मनिंदर बाडवाल, कपिल गायकवाड यांच्या वतीने अलिबाग शहरातील क्रिडा भवनच्या प्रांगणात दोन दिवस क्रीकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जय मल्हार संघाने मिळविला असून हा संघ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषकाचा मानकरी ठरला. अक्षय्या प्रशांत नाईक व माजी नगरसेवक अनिल चोपडा यांच्या हस्ते या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.



भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धा शनिवार व रविवार अशी दोन दिवस घेण्यात आली. अलिबाग शहरातील क्रीडा भुवनच्या प्रांगणात ही स्पर्धा रंगली. अलिबाग तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. दोन दिवस अलिबागच्या मैदानात रंगलेल्या या स्पर्धेत वेगवेगळ्या संघाने आपली कामगिरी बजावत विजय संपादन करण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि.31) मार्च रोजी सायंकाळी झाला. त्यामध्ये जय मल्हार संघाने अंतिम सामना जिंकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक मिळविला. या संघाला प्रथम क्रमांकाचे रोख 51 हजार रुपये चषक, थळमधील आरसी संघाला द्वीतीय क्रमांकाचे 31 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version