प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे महामानवास अभिवादन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग तसेच प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचातर्फे प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय राम-नारायण सभागृहात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, उमाजी केळुसकर, शरद कोरडे, उमेश पवार, आर.के.घरत,नंदु तळकर, भालचंद्र वर्तक, विकास पाटील, हेमकांत सोनार आदी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version