डॉ. बाविस्करांचा उचित पद्मश्री सन्मान

 वसंत चौलकर

एकेकाळी विंचू दंशाने मृत्यूचे प्रमाण कोकणात खूप मोठे होते. त्या भागातील विंचवाचे विष अधिक जहाल असे आणि त्याच्यामुळे झालेल्या विविध परिणामांमुळे रुग्ण दगावत असे. त्या लक्षणांचा सूक्ष्म अभ्यास करुन डॉ. बावस्कर यांनी उपचार पद्धती बदलली. औषधांचे पर्याय शोधले. त्यामुळे एकेकाळी वर्षभरात मिळून जिथे काहीशे माणसे मदत असत तेथे आता क्वचित एखादे वेळी एखादा मृत्यू होतो. पोलादपूर, महाड परिसरात बावस्कर दाम्पत्याला लोक दैवतासमान मानतात. या दोन्ही उभयतांनी रुग्णांची सेवा केल्याने त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्याबद्दल डॉ. हिम्मनाथ बाविस्कर उभयतांचे अभिनंदन.

अनेकजण सरकारी नोकरीसाठी धडपडत असतात आणि ती मिळाली की आपल्या घराजवळच बदली हवी यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. या पार्श्‍वभूमीवरच थेट विदर्भातील अत्यंत कोरड्या हवामानातून रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूरसारख्या अत्यंत दमट हवामानातून येऊन आयुष्यभर विनातक्रार सेवा करीत राहणे आणि येणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यात धन्यता न मानता त्यांच्या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधणे हे काम सोपे नसते. डॉ. हिम्मतराव बाविस्कर ऑगस्ट 1976 मध्ये पोलादपूर जवळ बिरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाले तेव्हापासून 40 ते 45 वर्षाहून अधिक काळ त्यांनी महाड-पोलादपूर परिसरातच काढला. त्यांनी सातत्याने रुग्णसेवा केली. त्यांच्याइतकेच, किंबहुना त्यातून अधिक कौतुक त्यांच्या पत्नीचे स्वतः एम.बी.बी.एस. असलेल्या डॉ. प्रमोदिनी यांनी आपल्या पतीच्या या व्रताला मनःपूर्वक साथ दिली. डॉ. बावस्कर सुद्धा आपल्या पत्नीचे मनापासून कौतुक करतात. या कामाच्या मागची प्रेरणा माझी पत्नीच आहे.
विंचू दंश आणि डॉ. बावस्कर हे नाते अजोड असे आहे. किंबहुना त्याच कार्यासाठी त्यांची ओळख सातासमुद्रापार पोहचली. एकेकाळी विंचू दंशाने मृत्यूचे प्रमाण कोकणात खूप मोठे होते. त्या भागातील विंचवाचे विष अधिक जहाल असे आणि त्याच्यामुळे झालेल्या विविध परिणामांमुळे रुग्ण दगावत असे. त्या लक्षणांचा सूक्ष्म अभ्यास करुन डॉ. बावस्कर यांनी उपचार पद्धती बदलली, औषधांचे पर्याय शोधले. त्यामुळे एकेकाळी वर्षभरात मिळून जिथे काही शे माणसे मरत असत तेथे आता क्वचित एखादेवेळी एखादा मृत्यू होतो.
विंचूदंशा खालोखाल कोकणात सर्प दंशाने बळी जात असत. आजही ते प्रमाण फार कमी झाले नाही. विंचू दंशावर झपाट्यासारखे काम झाले. उपचारांची माहिती पोहोचली आणि उपचार पद्धती बदलल्याने प्राणहानी कमी झाली. सर्पदंशाच्या बाबतीत ते तेवढ्या वेगाने झाले नाही. सर्पदंशाचे अनेक रुग्ण येत असतात. जगभरात सपाच्या साधारण 200 जाती आहेत. त्यातील 52 विषारी आहेत. यापैकी 4 जाती भारतात जास्त प्रमाणात आढळतात. नाग, मणेर, घोणस आणि फुरसे. कोकणात मणेरच्या दंशाचे प्रकार अधिक. हा साप या भागात जास्त प्रमाणात आढळतो. काही विशिष्ट काळात तो अधिक सक्रीय होतो. पावसाळ्यात भातशेतीमुळे त्याच्या बिळाची तोंडे बंद होतात. तोच काळ त्याच्या विणीचा असतो. त्यासाठी तो आडोसा शोधत मानवी वस्तीत येतो, कुठेतरी आडोशाच्या, कमी वर्दळीच्या, लाकडी ठेवलेल्या जागांसारख्या अडचणीच्या जागी तो लागतो. त्याला माणसाचा धक्का लागला की तो दंश करतो. पण तो इतका सूक्ष्म असतो की, पटकन लक्षात येत नाही. थोडा वेळ गेला की पोटात दुखू लागते, उलटी होते, त्यातच पक्षघाताचा धक्का बसतो आणि श्‍वास बंद होऊन दंश झालेली व्यक्ती दगावते.
ही सारी संशोधने करुन निष्कर्षाला येण्यासाठी डॉक्टरांनी शेकडो पेशंट तपासले. सर्वाच्या नोंदी घेतल्या. ते स्वतः ग्रामीण भागात, गावोगाव भटकले, सामाजिक स्थितीचे निरीक्षण केले.
वैद्यकीय शिक्षण संपवून डॉक्टर कॉलेजबाहे पडतात, तेव्हा ते एक शपथ घेत असतात. त्याला समाजसेवेचा, सामाजिक बांधिलकीचा स्पर्श असतो. सगळेच डॉक्टर ती शपथ घेतात. पण खूप कमी डॉक्टर ती निभावतात. डॉ. हिम्मतराव बावस्कर आणि त्यांची पत्नी डॉ. प्रमोदिनी यांच्यासारखे डॉक्टर ती निभावण्यासाठी आपले आयुष्यच पणाला लावतात. त्यातून त्यांना होणारी आर्थिक प्राप्ती खूप कमी असते, पण त्या पलिकडे त्यांनी जे कमावलेले असते ते कुठल्याही मापाने मोजता येण्यासारखे नसते. अशी माणसे मर्त्य जगात ‘वेडी’ गणली जातात. पण ती अपार श्रीमंत आणि विलक्षण उंचीची असतात. त्यांची श्रीमंती सदिच्छांमध्ये मोजावी लागते आणि उंची सर्व सामान्यांच्या नजरेत… मूळ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आणि कोकणातील महाड परिसरात लोकसेवा करणारे डॉ. बावस्कर दाम्पत्य सर्वार्थाने प्रेरक ठरावेत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 1976 मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी ते बिरवाडीला वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले.
याच गावात अतिविषारी विंचवाशी त्यांची पहिली भेट झाली. त्याच्या गावांकडे विंचू दंशाचे काही प्रकार होतात पण त्यामुळे कोणी मरत नव्हते. पण इथे इंचू चावून मेल्याच्या असंख्य घटना त्यांच्यासमोर आल्या आणि त्यातून त्यांच्या संशोधक वृत्तीने उचल खाल्ली त्यात परिपूर्ण संशोधन करुन त्यावरील उपाय शोधूनच ते थांबले. त्यांच्या ‘बॅरिस्टरचं कार्ट’ या आत्मचरित्रातही हे सारे विस्ताराने आलेले आहे. त्यांनी त्या विषयावर संशोधन करताना आधीच्या चार-पाच वर्षांतील विंचू दंशाच्या रुग्णांचे केस पेपर काढले, नाडीचे ठोके, रक्तदाब, श्‍वसनक्रिया, शरीराचे ताप, मान, हृदय व फुफ्फुसात झालेले परिणाम यावर त्यात कसल्याही नोंदी नव्हत्या. काही ठिकाणी ‘हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू’ इतकाच उल्लेख होता. ते महाडमध्ये काही वरिष्ठ व खाजगी डॉक्टरांना भेटले. तेथेही अनुभव तसाच आला. त्यातच विंचू दंशांमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूची असंख्य उदाहरणे त्यानिमित्ताने त्यांच्यासमोर येऊ लागली. अधिक खोलात जाता त्यांना असे कळले की, 1961 मध्ये डॉ.सी.एम. मुंडले यांनी ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये कॉलेजच्या ग्रंथालयात जाऊन त्यांनी तो अंक शोधला. त्यात डॉ. मुंडले यांनी 78 केसेस अभ्यासल्या होत्या. त्यातील 23 जण ‘पल्मोनरी इंडिया’ने दगावल्या. विशेष म्हणजे अमायनो फायलीन आणि पेथेडीन या पारंपारिक औषधांचा त्यांच्यावर काही परिणाम झालेला नव्हता. डॉ. बावस्कर स्वतः डॉ. मुंडले यांना भेटायला रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे गेले. त्यांनी देश-परदेशात केलेला पंचड पत्रव्यवहार पाहून ते चकित झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे चाललेले काम पाहून ते थक्क झाले. इथून खर्‍या अर्थाने त्यांची शोधयात्रा सुरु झाली.
त्यांच्या चाचण्या सुरुच होत्या. दंशामुळे हृदय कमजोर झालेले असताना त्याच्यावरील ताण वाढल्याने हृदयक्रिया बंद पडू शकते, असे वाटल्याचे त्यांनी हृदयाचा रक्तपुरवठा आवलप हिने नियंत्रण करण्याचाही प्रयत्न केला पण यश आले नाही. सप्टेंबर 1976 ते फेब्रुवारी 1975 या काळात एकंदर 20 रुग्णांचा सविस्तर अहवाल घेऊन जे.जे. मध्ये डॉ. शांतीलाल शहा यांना भेटले. तेव्हा ते इंडियन हार्ट जर्नलचे संपादकही होते. त्यांनी डॉक्टरांच्या अहवालावर त्यांच्या मासिकात अर्धे पान टिप्पण प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांनी आणखी 17 केसेसचा अभ्यास केला. त्या नोंदीवर आधारीत प्रयोग डॉ. एस.एस. जाधव यांनी केला आणि गिनिपिक ती प्रयोग बावस्करांच्या निरीक्षणाचा संदर्भ घेऊन 1978 मध्ये ‘लॅस्वेट’ या आंतरराष्ट्रीय जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाला.
दरम्यान आपल्याकडील विंचू दंशांच्या 51 केसेसवरील नोंदीवर आधारीत एक विस्तृत निबंध डॉ. बावस्करांनी लिहिला. या दरम्यान त्यांनी एम.डी. पूर्ण केले आणि त्यानंतर परत कोकणातच पोस्टिंग मागितली. खरेतर एम.डी. नंतर त्यांना त्यांच्या गावापासून जवळपास पोस्टिंग देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली होती. पण आपण हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना परत कोकणातच जायचे होते. तेथे विंचू दंशाचे असंख्य पेशंट त्यांची प्रतीक्षा करीत होते. म्हणून ऑगस्ट 1982 मध्ये ते पोलादपूर येथे रुजू झाले. त्या आधीने अंबाजोगाईच्या  डॉ. प्रमोदिनी यांच्याशी विवाहबद्ध झाले. पोलादपूरात दाखल झाल्यानंतर जोडीने त्यांनी रुग्णसेवेला प्रारंभ केला. 1983 मध्ये विंचू दंशावरील त्यांच्या उपायांना पहिले यश आले आणि त्यांनी एका पेशंटला वाचविले. त्यासाठी त्यांना अनेक सव्यापसव्य करावे लागले. जोखीम उचलावी लागली. विंचू दंशावर कुणी डॉ. हिम्मतराव बाविस्कर पोलादपूर येथे संशोधन करीत आहेत आणि त्यांनी एक मुलाला वाचविले आहे. ही बातमी वार्‍याच्या वेगाने कोकणभर पसरली आणि मग पनवेल ते रत्नागिरीपर्यंतच्या पट्ट्यांतील रुग्णांचा लॉस रात्री-अपरात्री पोलादपूरच्या दवाखान्यात लोटू लागला. 1984 मध्ये त्यांनी 126 रुग्ण जगविले ही सारी निरिक्षणे आणि निष्कर्ष 1986 मध्ये ‘लेन्सेट’ मध्ये प्रकाशित झाले. पण त्याची फारशी चर्चा कुठे झाली नाही.

Exit mobile version