डॉ. दक्षता पाटीलचे एम.डी. परीक्षेत यश

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

शहापूर येथील संतान सुदाम पाटील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता यांची सुकन्या डॉ. दक्षता पाटील हिने बीएएमएसनंतर एम.डी. (मेडीसिन) परीक्षेत प्रथम श्रेणीत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने यश प्राप्त केले आहे.

आत्मविश्‍वास, डॉक्टर होण्याची महत्त्वकांशा व कठोर परिश्रमाच्या जोरावर डॉ. दक्षता पाटीलने हे यश संपादन केले आहे. दक्षताचे दहावीपर्यंतचे शिक्षण शहापूर हायस्कूल येथे असून, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकूनही प्रथम क्रमांकाने 95 टक्के गुण मिळविले होते. तसेच अकरावी व बारावी सायन्सपर्यंत शिक्षण ना.ना. पाटील हायस्कूल पोयनाड येथे झाले.

डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालय नेरूळ-मुंबई येथे बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रातील नाशिक विद्यापीठाच्या डी.एम.एम. आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ येथे एमडी (मेडीसिन) पूर्ण केले आहे. परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गाव व समाजाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

Exit mobile version