डॉ. आमलपुरे यांना हिंद शिरोमणी पुरस्कार

| कोलाड । वार्ताहर |

तटकरे चारीटेबल ट्रस्ट संचालित डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय – गोवे कोलाड येथील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत विश्‍वनाथ आमलपुरे याना या वर्षीचा भव्या फाउंडेशन जयपूर, येथून दिला जाणारा आंतराष्ट्रीय हिंद शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. आमलपुरे हे गेली 13 वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करतात. हिंदी भाषा, साहित्याचे प्रसार-प्रचार हि करतात. त्यांच्या एकूण साहित्यसेवा, शिक्षण क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांचे 50 शोध निबंध प्रकाशित झाले असून तीन पुस्तकाचे लेखन हि केले आहेत. म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल संदीप तटकरे, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या नेहल प्रधान, अमोल गोळीपकर, डॉ.सतीश सावळे, प्रा. रेश्मा शेळके, प्रा. राधाकृष्णन, प्रा. अनिरुद्ध मोरे, प्रा दर्शन, प्रा. जयवंती अडलीकार यानी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version