डॉ. केतकी तरे यांच्या हाती सरपंचपदाची धुरा

शहाबाजच्या उपसरपंचपदी भूपेंद्र पाटील बिनविरोध
| अलिबाग | प्रतिनिधी |
शहाबाज ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष व इंडिया आघाडीच्या डॉ. केतकी सतीश तरे बहुमताने निवडून आल्या. शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी उपसरपंच म्हणून शेकापचे भुपेंद्र जनार्दन पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. भूपेंद्र पाटील यांच्याकडे दुसऱ्यांदा उपसरपंचपदाची धुरा सोपविण्यात आली.

उपसरपंचपदासाठी भूपेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती बाळूशेट पाटील, शहाबाजचे माजी सरपंच सतिश तरे यांनी नवनिर्वाचित सरपंच केतकी तरे, उपसरपंच भुपेंद्र पाटील व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य संदेश बैकर, सनील पाटील, प्रवीण पाटील, समीर भोईर, सोनल म्हात्रे, स्वाती जुईकर, अश्विनी पाटील, संगीता म्हात्रे, अश्विनी अशोक पाटील, रुचिता चोरगे आदी उपस्थित होते.

Exit mobile version