सभापतीपदी शंकरराव म्हस्कर, उपसभापतीपदी सुरेश कोतवाल बिनविरोध
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुका कृषी औद्योगिक शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघावर 13 संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, सभापतीपदी शेतकरी कामगार पक्षाचे व कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर, तर उपसभापतीपदी सुरेश कोतवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रोहा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रोहा यांच्या अध्यक्षतेखाली सदरच्या संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी रायगड जिल्हा बँकेचे संचालक तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणेश मडवी, रोहा तालुका शेकाप चिटणीस राजेश सानप, गणपत म्हात्रे सभापती कृषी बाजार समिती रोहा, हेमंत ठाकूर अध्यक्ष मजूर फेडरेशन अलिबाग, विनायक धामणे संचालक कृषी बाजार समिती रोहा, नंदकुमार म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य व शेकाप नेते, विठ्ठल मोरे, गोपीनाथ गंभे, बिंदास धनावडे, शांताराम महाडिक, गणेश म्हसकर, संतोष दिवकर, जितेंद्र जोशी, राम गिजे, दीपक पाडगे, गणेश खरीवले सरपंच भातसई, मंगेश धमाल, अशोक जंगम, मारुती खांडेकर, बबन म्हसकर, संजय शेळके, वैभव पाटील, तुकाराम शिंदे, शशिकांत कडू, समीर देशमुख, प्रतापराव देशमुख, खेळू ढमाळ इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापतीपदी शंकरराव म्हसकर व उपसभापतीपदी सुरेश कोतवाल यांची बिनविरोध निवड करत संचालकपदी शिवराम महाबळे, अनंत वाघ, अनिल तवटे, विकास कोळीसे, अंजली जंगम, मनोहर महाबळे, दीपिका पाडगे, रिना गिजे, महादेव मोहिते, परशुराम वाघमारे, वैभव धामणे या शेकापच्या 13 संचालकांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापती शंकरराव म्हसकर, उपसभापती सुरेश कोतवाल यांचे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस तथा राजिपचे माजी उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, गणेश मढवी, संचालक रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. राजेश सानप, तालुका चिटणीस, गणपत म्हात्रे सभापती बाजार समिती, शिवराम महाबळे, अनंता वाघ, मारुती खांडेकर, हेमंत ठाकूर, विनायक धामणे, जितेंद्र जोशी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.