| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरांसह पंचक्रोशी भागातील आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी नुकतेच नियुक्त झालेले प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. महालिंग शांती लिंग क्षीरसागर यांची मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान परिसरातील आरोग्य सुविधा, नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.तद्नंतर डॉ महालिंग शांती लिंग क्षीरसागर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विरेंद्र भगत, नगमाना खानजादे, पांडुरंग आरेकर, रुपेश रणदिवे, मनिष विरुकुड, श्रीकांत खोत उपस्थित होते.







