। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले नवे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज रायगड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली झाली असून, डॉ.महेंद्र कल्याणकर हे रायगडचे नवे जिल्हाधिकारी आहेत. बदलीचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मंगळवारी डॉ. महेंद्र कल्याणकर रुजू झाले आहेत. 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे रायगडचे नवीन जिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.