डॉ. विनोदराव मोरे सद्भावना पुरस्काराने सन्मानित

। चिपळूण । वार्ताहर ।
दिल्ली येथील डॉ.अब्दु ल कलाम फाऊंडेशनतर्फे, प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक कार्यात आत्मियतेेने काम करणार्‍या डॉ.विनोदराव मोरे यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाड येथील फाऊंटन इन हॉटेल या ठिकाणी रोटरी क्लब, मुंबईचे प्रमुख हरजित सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.विनोदराव मोरे यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान असून ज्यावेळी सावित्री पुलाची दुर्घटना घडली त्यावेळी एनडीआरएफ टीमच्या जवानांसह तब्बल 1600 लोकांची 22 दिवस स्वतःच्या फाउंटन इन हॉटेल मध्ये मोफत सर्व व्यवस्था केली. तसेच पोलादपूर तालुक्यातील तुटवली ते निवे या गावांमधील 15 किलोमीटर रस्ता स्वखर्चाने करून दिला. यामुळे परिसरातील संपर्क तुटलेली 50 गावे संपर्कात आली.
डॉ.मोरे यांची स्वर्गीय आई शेवंतीबाई मोरे यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेले आई फाऊंडेशन राष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून 95 मुलांना दत्तक घेण्यात आले असून त्यांची सर्व देखभाल डॉ.विनोदराव मोरेंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत. असे विविध समाजाभिमुख उपक्रम विनोदराव मोरे यांच्या माध्यमातून राबविण्यात आले असून त्यांचे कार्य सुरूच आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आजपर्यंत विविध राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.

Exit mobile version