। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय कराटेपटू व क्रीडा शिक्षक कुमारी शितल कृष्णा गायकवाड यांना 2022 सालचा इंटरनॅशनल हेल्थकेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई अंधेरी येथील हॉलिडे इन हॉटेल येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते पुरस्कार शितल गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी सहा हजार महिलांचे नामांकन आले होते यात पाच महिलांची निवड करण्यात आली। यात शीतल गायकवाड यांचा समावेश असल्याचे शितल गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान शीतल गायकवाड यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय, आंतरराज्य राज्य पुरस्कार प्राप्त केले आहेत . शीतल गायकवाड या खोपोली येथील केएमसी महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलींना प्रशिक्षित करण्यात खर्ची घातले आहे . के.एम.सी. महाविद्यालयातील प्राचार्य तसेच संस्थेचे अध्यक्ष सचिव व कार्यकारणी यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे शितल यांनी बोलताना सांगितले.