| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांचा असलेला तुटवडा, जलजीवन मिशन योजनांमार्फत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन नवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिले. रायगड जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांची भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान झालेल्या चर्चेत ते म्हणाले रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा आहे. शासन लवकरच शिक्षक भरती करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. शिक्षक म्हणून तरुणांना संधी मिळणार आहे. शासनाच्या आदेशानुसार तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत 81 टक्के काम पुर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ज्या भागात जलजीवन योजनेअंतर्गत केलेले काम अपुर्ण असेल, तसेच योजना राबवून देखील पाणी उपलब्ध होत नाही, त्या ठिकाणची पाहणी करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन बास्टेवाड यांनी दिले.