जासई शाळेत नाटिकेचे सादरीकरण

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील जासई प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून जय शिवाजी जय भवानीच्या जयघोष करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोंढाण्याचा सिंहगड तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगणारी, गड आला पण सिंह गेला ही नाटीका सादर केली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी पोवाडे आणि भाषणे सादर करून, वातावरण शिवमय केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक नृत्याचा अविष्कार पाहायला मिळाला. शाळेच्या शिक्षिका मीनल माळी यांनी महाराजांच्या जीवनावर स्वरचित पोवाडा सादर केला. दिपाली खरात आणि माता पालकांनी शाळेत सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या.

आरंभी जासई ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच संतोष घरत, कार्यकर्ते अजय घरत यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प मालिका अर्पण करून भगवा फडकवून अभिवादन केले. शाळा समितीच्या अध्यक्षा परवीन शेख, उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अध्यापक स. अ.पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक रुपेश पाटील, श्री कडू, आणि श्री मोकल यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते.

Exit mobile version