| पुणे | वृत्तसंस्था |
पुणे – नाशिक महामार्गावर अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्कॉर्पियो कार चालवत तीन वाहनांना धकड दिली. त्यात रिक्षा चालक अमोद कांबळे (27) यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस निरीक्षक पंकज महाजन यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक 17 वर्ष 10 महिन्यांचा आहे. तो पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील भारतील लष्करात सैनिक आहे. त्या मुलाने मद्यपान केल्यानंतर मित्राची एसयुव्ही कार भोसरीवरुन नाशिक फाटापर्यंत वेगाने नेली. त्यानंतर त्या गाडीवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्याने तीन वाहनांना धडक दिली आणि डिव्हाडरला ठोकली. भरधाव असणाऱ्या एसयूव्ही कारच्या धडकेमुळे ऑटोरिक्षा, एक स्कूटर आणि एक मोटारसायकल यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात रिक्षा चालक कांबळेचा मृत्यू झाला तर स्कूटर आणि मोटार सायकलवर असणाऱ्या दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.