महिलांचे मुख्याधिकार्यांना साकडे
| माथेरान | वार्ताहर |
ई-रिक्षा माथेरानमधील हातरिक्षा चालकांनाच देण्यात याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे याबाबतीत सनियंत्रण समितीने मार्ग निश्चित करून या ई-रिक्षाच्या संख्येत वाढ करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार नगरपरिषदेने या रिक्षांची सेवा चोवीस तास उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध, गरोदर महिला, रुग्णांना घरापर्यंत सेवा द्यावी, अशी मागणी येथील महिलावर्गाने प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
94 परवानाधारक हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी वर्षा शिंदे, अर्चना बिरामणे, सुहासिनी दाभेकर, मंदाकिनी तुपे, उज्वला राणे, अनिता चावरे, वैशाली दळवी, कविता बल्लाळ, अनिता रांजाणे, मंगल गायकवाड, मनीषा शिंदे, साक्षी लोखंडे, स्नेहा गोळे, कल्पना पाटील, जागृती शिंदे, सुजाता जाधव, कामिनी शिंदे, श्रद्धा रामाणे, सुप्रिया कदम, मंदा नाईकडे, दीपा परब आदी महिला उपस्थित होत्या. याबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले.