दोन ट्रकच्या मध्ये दबल्याने चालकाचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी |

दोन ट्रकच्या मध्ये दबल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पाडेघर जवळ घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रजनीश यादव यांनी ट्रक क्रमांक एमएच 46 बीयू 6199 हा पनवेल जेएनपीटी सर्विस रोड केके लॉजिस्टिकच्या बाजूला पाडेघर येथे उभा करून ते ट्रकची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्या पाठीमागे ट्रक क्रमांक 46 बीएफ 0639 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हा देखील उभा करून तो खाली उतरला होता. यावेळेस अंशू शंकरलाल यादव (17) हा ट्रकची पाहणी करण्यासाठी पाठीमागील बाजूला गेला. यावेळी पाठीमागे उभा असलेला ट्रकचा हॅन्ड ब्रेक न लावल्याने ट्रक पुढे आला आणि अंशू यादव हा दोन्ही ट्रकच्यामध्ये दबून गंभीर जखमी झाला. आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक जगदीप देवेंद्र प्रसाद गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version