कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

| नेरळ | प्रतिनिधी |

मुरबाड कर्जत महामार्गावर चाहूचीवाडी येथ कंटेनर दरीत कोसळून अपघात झाला. अपघातात कंटेनर चालकांचा मृत्यू झाला आहे. संजय जाधव असे चालकाचे नाव आहे.

सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असलेले संजय शंकर जाधव हे मुरबाड येथून कर्जतकडे कंटेनर (एमएच-04-टी-1849) घेऊन निघाले होते. कर्जत तालुक्यातील चाहूची वाडी येथील एका तीव्र उतारावरील वळणावर कंटेनर चालकाचा वेगावरील ताबा सुटून कंटेनर दरीत कोसळला. स्थानिक रहिवाशी हे कंटेनर दरीमध्ये कोसळल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. कंटेनर खोल दरीत कोसळल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्टमधील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, कंटेनर चालक संजय शकर जाधव यांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version