| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील जेएनपीटी ते पळस्पे रोडवरील डोबाळे महाविद्यालय क्रॉसींग पुलावर दोन ट्रेलरचा अपघात झाला. यामध्ये एका ट्रेलर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन महेश कुमार (22) रा. शहागंज, जौनपुर असे मृताचे नाव आहे.
ट्रेलर वरील चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून त्याच्या समोर असलेल्या ट्रेलरला ठोकर मारली असता ट्रेलर चालक सचिनच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अपघताची खबर न देता तसेच जखमीला वैद्यकीय मदत न करता चालक पळून गेला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.