मोकाट गुरांमुळे वाहन चालक त्रस्त

। सुतारवाडी । वार्ताहर ।
ग्रामीण तसेच शहरी भागात उनाड गुरांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा मोठा उच्छाद मांडला आहे. याचा वाहन चालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. वाळंजवाडीपासून विळे भाडपर्यंत रस्त्यावरून अनेक लहान-मोठी वाहने तसेच अवजड वाहने रात्रंदिवस ये-जा करत असतात. सातत्याने जाणार्‍या येणार्‍या वाहनांना या गुरांचा मोठा अडथळा येत असल्यामुळे मार्गक्रमण करताना मोठी दमछाक होत असते. तरी या गुरांचा बदोबस्त करावा, अशी विनंती वाहन चालकांकडून होत आहे.

Exit mobile version