अमली पदार्थ तस्करीचे धागेदोरे परदेशात

| अलिबाग | प्रतिनिधी |

खोपोली पोलिसांनी ढेकू गावाजवळ छापा टाकून अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता.त्या कारवाईनंतर आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो परदेशात अंमली पदार्थ पाठविणारा कस्टम क्लिअरींग एजंट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अमली पदार्थाच्या तस्करीचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहचले असल्याचे उघड झाले आहे.

ढेकू येथे बंद असलेल्या कारखान्यात अवैधरित्या अमली पदार्थ तयार करणाऱ्याचा कारखाना सुरु होता. सात डिसेंबरला छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीत वाढ केली. अधिक तपासात या गुन्ह्यात एका एजंटचा समावेश असून तो मुलंड येथे राहत आहे. देवराज गडकर असे त्याचे नाव आहे. तो परदेशात अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे उघड झाले. न्यायालयाने त्याला 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version