तरुणाईस अमली पदार्थांचा विळखा
| रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
दिवसांपूर्वीच दिल्लीहून केरळला जाणार्या दोघा संशयितांकडून सुमारे साडेचार लाखांची एमडी पावडर जप्त करण्यात आली होती. यापूर्वी ग्रामीण पोलिसांनी एमआयडीसीमध्ये छापा टाकून अमली पदार्थांच्या पावडरचा साठा जप्त केला होता. कोणत्या न कोणत्या कारणाने जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीशी कनेक्शन असल्याचे वारंवार पुढे येत आहे. मात्र, तपासाला मर्यादा आल्याने कोणत्याही प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अमली पदार्थांचे 20 गुन्हे उघडकीस आले असून, यातून सुमारे 20 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी 28 जणांना अटक करण्यात आली आहे.