| मुंबई | प्रतिनिधी |
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने भारतातील 7 लाखांहून अधिक गावांशी संपर्क वाढवण्यासाठी सीएससी ग्रामीण ई-स्टोअरसोबत भागीदारी केली आहे. सीएससी ग्रामीण ई-स्टोअरच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून महिंद्राच्या वाहनांची चौकशी आणि खोल ग्रामीण भागातील चच् ला रीअल-टाइम ऑनलाइन लीड ट्रान्सफर करेल, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे.
सीएससी ची पाथ-ब्रेकिंग डिजिटल टूल्स वापरून, व्हिलेज लेव्हल एंटरप्रेन्युअर्स उत्पादनाच्या वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण देतील,असा महिंद्रातर्फे दावा करण्यात आला आहे. सीएससी च्या पथ-ब्रेकिंग डिजिटल टूल्सचा वापर करून, ग्रामस्तरीय उद्योजक ग्राहकांना उत्पादन वैशिष्ट्ये समजावून सांगतील आणि अधिकृत महिंद्रा डीलर्सकडून पुढील कारवाईसाठी सोबत खरेदीचा हेतू सामायिक करतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. असोसिएशनच्या माध्यमातून, उडउ तङए नेटवर्क संपूर्ण भारतातील 7 लाखांहून अधिक गावांमध्ये चच् टचपॉइंट्स म्हणून काम करेल, चौकशी आणि खरेदीच्या प्रक्रियेला आणखी मदत आणि सुलभ करेल, बोलेरो, बोलेरो निओ, स्कॉर्पिओ, दणत 300, मराझो, बोलेरो पिकअप आणि बोलेरो मॅक्सी ट्रक यासारख्या निवडक वाहनांची चौकशी करण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या स्टोअरला भेट देऊ शकतात, माहिती, चाचणी ड्राइव्ह आणि अधिकृत महिंद्रा डीलरद्वारे वितरण सुलभ करण्यासाठी तङए द्वारे यावर डिजिटल पद्धतीने प्रक्रिया केली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.