कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट

मुंबई सीमाशुल्क विभागाची कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो अमली पदार्थ नष्ट केले आहे. अमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम मुंबई सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मुंबई सीमाशुल्क क्षेत्र एआय, सीबीआयसीच्या उच्चस्तरीय अमली पदार्थविरोधी समितीसमोर राबवण्यात आली.

महाराष्ट्रात नवी मुंबईतील तळोजा येथील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा, एमडब्ल्यूएमएल येथे हे अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अवैध बाजारपेठेतील किंमत सुमारे 410 कोटी रुपये आहे. या वर्षभरात अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा अंदाजे 240 कोटी रुपये किमतीचे 61.585 किलो आणि नंतर अवैध बाजारात 865 कोटी रुपये किमतीचे 128.47 किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. अशा प्रकारे, या वर्षात 1515 कोटी रुपये किमतीचे एकूण 244.905 किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. विशेष तपास, गुप्तचर शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय यासारख्या विविध संस्थांनी हे अमली पदार्थ जप्त केले होते.

Exit mobile version