| मुंबई | प्रतिनिधी |
नवीन वर्षाच्या आगमनास काही दिवस राहिले आहे. तरुणाई नवीन वर्षांच्या स्वागतासाठी उत्सुक असते. यामुळे 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर दारुची विक्री होत असते. तसेच अनेक ठिकाणी ड्रग्सही विकले जाते. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) विभाग सक्रीय झाला आहे. एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई करत 5 कोटी 20 लाखांचे ड्रग्स जप्त केले आहे. दोन कारवाईत हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये गांजाची झाडे उगवून त्यातून त्याची तस्करी होत असल्याचेही समोर आले होते. एनसीबीला डार्क वेबच्या माध्यमतून ही गांजा तस्करी होत असल्याचे समजले. त्यानंतर एनसीबीने छापा टाकून मुंबईतून आरोपीला अटक केली आहे. एनसीबीने दुसर्या कारवाईत मुंबई विमानतळावर थायलंडमधून भारतात येणारे ड्रग्स पकडले. या तस्करीत मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आले आहे. थायलंडमधून बँकॉक आणि नंतर मुंबईत आलेले ड्रग्सचे पार्सल एनसीबीने पकडले आहे. त्यातून 13 किलो हायब्रिड स्ट्रेन गांजा सापडला आहे. या गांजाची तस्करी करण्यात कोल्हापूरची एक व्यक्ती असल्याचे समोर आले. त्या संशयित व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत 15 कोटी 20 लाखांचे ड्रग्स जप्त झाले.
काही दिवसांपूर्वी नवी मुंबई शहरामध्ये बारा कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त करण्यात आले होते. नवी मुंबई गुन्हे शाखाने विविध भागात 25 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अंतर्गत 13 नायजेरियन लोकांना पोलिसांनी घेतले. तसेच तीन नायजेरियनकडे कागदपत्रे नसल्याने त्यांना ताब्यात घेतले होते. नायजेरियनकडून पोलिसांनी बारा कोटी रुपयांचे ड्रग्स मिळाले होते.