अबब ! 1200 कोटीचे ड्रग्ज

| पुणे | वार्ताहर |

गेल्या तीन दिवसांपूर्वी पुणे शहरात ड्रग्जविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे हजारो किलो ड्रग्ज जप्त केले होते. यानंतर आता पुणे पोलिसांनी थेट नवी दिल्लीत कारवाई करत 1200 कोटी रुपयांचं तब्बल 600 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. तीन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचे 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच ‘ड्रग्ज मुक्त पुणे’ ही मोहीम हाती घेतली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पुण्यात मंगळवारी कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांकडून दिल्लीत आणखी एक कारवाई करण्यात आली. दिल्लीत 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

Exit mobile version