| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीला दिघी सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 17 हजार रुपये किमतीचा 34 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.25 वाजण्याच्या सुमारास दिवेआगर येथील मोहल्ला परिसरात क्रिकेट मैदानासमोरील रस्त्यावर घडली. संबंधित आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ जवळ बाळगत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार दिघी (सागरी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी करीत आहेत.
दिवेआगरमध्ये 17 हजारांचे अमली पदार्थ जप्त
