खासगी कार चालक पोलीस मद्यधुंद
। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग- पेण मार्गावरील गोकुळेश्वर येथे कार आणि टेम्पो या दोन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या तरुणी देखील जखमी झाली. कारमधील चालक रायगड पोलीस दलात असून सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. मद्यधुंद अवस्थेत पेणकडून अलिबागकडे कार घेऊन येत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच बचावासाठी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र एक पोलीस कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. दारू पिऊन वाहन चालवणे गुन्हा असताना पोलीसाने या नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा संतप्त जमावातून व्यक्त करण्यात आली.





