| रायगड | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. थंडीची चाहूल लागल्याने शरिरातील उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांसह सुक्यामेव्याची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अंजीर, काजूच्या दरात वाढ झाली आहे. तर पिस्ता, बदाम जर्दाळूच्या दरात मात्र घसरण झालेली आहे.
थंडीच्या काळात शरीरातील उष्मा वाढीसाठी ड्रायफ्रुट्स अधिक परिणामकारक ठरतात. त्यामुळे आरोग्य संवर्धनासाठी आवश्यक अशा पदार्थांना मागणी वाढली आहे. तसेच, ऊर्जा निर्माण करणाऱ्या मेथी, सुका मेव्याचे लाडू, बदाम, काजू, अक्रोड, जर्दाळू, खोबरे, खारीक, डिंक, गोडंबी, पिस्ता, अंजीर, आदींना विशेष मागणी आहे. सध्या बाजारात मेथी तसेच डिंकाचे लाडूचे दर स्थिर असून 600 रुपये किलोने विक्री होत आहे. तर काजू, अंजीरच्या दरात वाढ झाली आहे. खारीकच्या दरात घसरण झाली आहे, तर जर्दाळूसह अन्य काही सुक्यामेव्याचे दर काहीसे वधारले आहेत.
मेथी दाणा 120 रुपये किलो, खसखस 2400 रुपये किलो, काळे मनुके 600 ते 700 रुपये, लाल मनुके 900 ते 1000 रुपये आहे.
ड्रायफ्रुट्स किलोप्रमाणेः बदाम- 640 ते 820, काजू- 500 ते 850, मनुके- 400 ते 450, पिस्ता- 850 ते 1500, अंजीर- 850 ते 1500, जर्दाळू- 600 ते 900, खोबरे- 110 ते 130, खारीक- 100 ते 350, अक्रोड- 600 ते 1000, डिंक लाडू- 560, मेथी लाडू- 560 रुपये असे दर आहेत.
