पावसामुळे शेतातील राब झाले हिरवेगार

एक आठवड्यात भातलागवड

| पाताळगंगा | वार्ताहर |

गेले अनेक दिवस पाऊस पडत असल्याने शेतातील राब तयार होत उत्तम होत आहेत. मागील वर्षी पावसाने लपंडाव खेळत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, यावर्षी वरुणराजानं शेतकरी बांधावांवर कृपादृष्टी केली आहे. यामुळे दुबार पेरणीचं संकट टळले आहे. सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. यामुळेच बैलजोडीच्या सहाय्याने शेतात उखळणी सुरु झाली आहे.

दरवर्षी पाऊस नियोजित वेळेवर पडेल याची आता शाश्‍वती राहली नाही. मात्र, शेतात राब पेरणी केल्यानंतर पाऊस मौन रुप धारण केल्यामुळे शेतातील राब करपून जात असतात. मात्र, यावर्षी पाऊस राबांसाठी उपयुक्त पडत असल्याने सध्या शेतातील भातरोपे चांगली हिरवीगार झाली असून, आठवडाभरात लावणीयोग्य होतील, अशी माहिती शेतकर्‍यांनी दिली.

Exit mobile version