अवकाळी पावसामुळे सुका म्हावरा महागला

। तळा । वार्ताहर ।
गेले काही दिवस कोसळणार्‍या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना लागणारी सुकी मच्छी देखील महाग झाली आहे. मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव समुद्रात जात नसल्याने तळ्यातील ग्राहकांना मच्छी मिळणे बंद झाली आहे. त्याचा परिणाम सुकी मच्छीवर झाला आहे.
तळा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर रहाटाड, मांदाड, वाशी येथून मोठ्या प्रमाणावर मच्छी विक्रीसाठी कोळी बांधव येत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून अवकाळी कोसळणार्‍या पावसामुळे येथील कोळी बांधवांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला होता, त्यामुळे त्यांनी समुद्रात मासेमारी करण्यास जाणे टाळले आहे. यामुळे सुक्या मच्छीवर देखील मोठा परिणाम झाला असून भाव गगनाला भिडले आहेत.
कोकणात मोठ्या प्रमाणावर सुकी मच्छी खाल्ली जाते.तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक देखील आवर्जून सुखी मच्छी खरेदीसाठी बाजाराला येत असतात. सुक्या मच्छीमध्ये सुकटीला मोठी मागणी असते. काहींना तर सुकटी शिवाय जेवणही जात नाही परंतु वेळोवेळी बदलणारे हवामान यामुळे ही सुकट देखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. अवकाळी पावसामुळे सर्वच वस्तूंवर महागाई वाढली असून सुक्यामच्छी देखील गोरगरीबांना न परवडणारी अशी झाली आहे.

दर किलोमागे
बारीक सुकट 500 रूपये, बोंबील 500 रूपये, बगा 400 ते 450 रूपये, मासु 500 रूपये,म्हाकली 500 रूपये, अंबाड 500 रूपये

Exit mobile version