आयओटीएल कंपनीकडे साडेपाचशे कोटींची थकबाकी

| उरण | सुनिल ठाकूर |

मौजे नवघर, ता- उरण, जि- रायगड येथे सिडकोच्या मालकीच्या जमिनीमध्ये सुमारे सन 1996 पासून आय.ओ.टी.एल. या कंपनीकडे साडेपाचशे कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यात सिडको प्रशासन टाळाटाळ करताना दिसत आहे.

ही कंपनी नाफ्ता व ईतर ज्वलनशिल रसायने साठवणुकीचा व्यवसाय करीत आहे. त्या करिता कंपनीने सिडकोकडून आवश्यक असलेल्या परवानग्या व भोगवटा प्रमाणे पत्र घेतलेले नाही, याची जाणीव सिडकोच्या सर्व संबंधित अधिका-यांना असुन सुद्धा कोणत्याही अधिका-यांनी कंपनी विरोधात ठोस अशी कारवाई केलेली नाही. सदर कंपनी विरोधात कारवाई करणेत यावी या करिता येथील स्थानीक प्रकल्पग्रस्त श्री राम दशरथ पाटील यांनी नियोजनकार बांधकाम परमिशन विभाग सिडको कार्यकारी अधिकारी अतिक्रमण विभाग सिडको व दक्षता विभाग अधिकारी सिडको यांचेकडे निवेदन देऊन सदर कंपनी विरोधात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. मात्र त्यानंतर कंपनी विरोधात सिडकोकडून कुठलीच कारवाई केली जात नाही.

राम पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कंपनी ही विनापरवाना अनधिकृतपणे सिडकोच्या जागेमध्ये व्यवसाय करीत आहे. हे मान्य करून कंपनी विरोधात कारवाई करणे सिडको अधिकार्‍यांना भाग पडले आहे. यानुसार सर्विस चार्ज, दंड त्यावरील व्याज वगैरे प्रमाणे साडेपाचशे कोटींची रक्कम कंपनीकडून सिडकोस देणे लागत असल्याचे अकाउन्ट सेक्शन कडून निश्‍चित करणेत आलेले आहे. व सध्या सदरची फाईल पुढील कारवाई करणेसाठी शहर व्यवस्थापक चे अधिकारी भरत ठाकुर यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे असे समजते .परंतु, सुमारे दोन महिन्याचा कालावधी उलटुन देखील संबंधित विभागाकडून वरील प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Exit mobile version