दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरूवात

रोहित, बुमराह एकमेकांविरुद्ध भिडणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आयपीएल व्यतिरिक्त आता दुलीप ट्रॉफीमध्ये एकमेकांविरुद्ध भिडताना पहायला मिळणार आहेत. साधारणत: 14 वर्षांनंतर हे आश्‍चर्यकारक दृश्य पहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. एका संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करू शकतो आणि दुसर्‍या संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करू शकतो. अशा परिस्थितीत रोहित शर्मा पहिल्यांदाच जसप्रीत बुमराहच्या चेंडूना सामोरे जाईल तर तो बुमराहला कसा खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आगामी दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरूवात होणार असून 24 सप्टेंबरपर्यंत ही मालिका खेळवली जाणार आहे. यावेळी बीसीसीआयने भारताच्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यास सांगण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंनाही दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून बांग्लादेश दौर्‍यासाठी तयारी चांगली होऊ शकेल. दुलीप ट्रॉफी स्पर्धा यापुढे झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार नाही. यामुळे एकूण चार संघ जाहीर केले जातील. ज्याचे नाव भारत अ, ब, क आणि ड असेल. त्यामुळे रोहित शर्मा एका संघाचे नेतृत्व करू शकतो आणि जसप्रीत बुमराह दुसर्‍या संघाचे नेतृत्व करू शकतो.

रोहित शर्माच्या संघात देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिळक वर्मा, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि ईशान किशनसारखे खेळाडू असू शकतात. तर, बुमराहबद्दल बोलायचे झाले तर यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि उमरान मलिकसारखे खेळाडू त्याच्या संघात खेळू शकतात. यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

संभावी प्लेइंग 11
भारत ‘अ’:
रोहित शर्मा (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिळक वर्मा, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, इशान किशन, शम्स मुलानी, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

भारत बः
जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, उमरान मलिक, आकाशदीप सिंग, साई किशोर आणि केएस भरत
Exit mobile version