| पनवेल | वार्ताहर |
रॉयल्टी न भरता सहा ब्रास माती (गौण खनिज) वाहतूक करीत असताना टी पॉईंट येथे तहसील कार्यालय पथकाने कारवाईसाठी संबंधित डंपर थांबवला. चौकशीदरम्यान डंपरचालकाने डंपरसह धूम ठोकली. त्याबाबत तहसील कार्यालय पथकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना बेकायदेशीर माती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कसलखंड हद्दीतील ग्राम महसूल अधिकारी विनय पाटील यांना संबंधित डेपरवर कारवाई करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूल अधिकारी विनय पाटील यांच्यासह महसूल महिला अधिकारी अनिता पवार व प्रिया वैती या पथकाने टी पॉईंट येथे सापळा रचला. त्यानुसार या पथकाला डंपर दिसताच थांबवले. यावेळी त्या डंपर चालकाला डेपरमधील असलेल्या मातीच्या वाहतुकीबाबत रॉयल्टी पावतीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने या मातीची रॉयल्टी भरली नसल्याचे सांगितले. पथकाने त्यांना नावे विचारली असता चालक रवि कुमार व क्लिनर डिगंबर कुमार असे सांगितले.