। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील शिरढोण गाव साईकृपा हॉटेल समोर एका डंपरची धडक मोटारसायकलीस बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकवरील एका व्यक्तीचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे. तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे. शिरढोण गाव साईकृपा हॉटेल समोर मुंबई – गोवा महामार्गावरील गोवा लेनवरून जाणाऱ्या डंपरची मोटारसायकलीस धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकवरील अतुलकुमार शिवकुमार (26) रा. रबाळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा सहकारी शुभम सरफणे (28) रा. कल्याण हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







