विठ्ठलनगरमध्ये दुर्गामाता एक्सप्रेस देखावा

| नागोठणे । वार्ताहर ।

विठ्ठलनगर मधील स्वयंभू मित्रमंडळाच्या तरूणांनी 8 ते 10 दिवसांच्या मेहनतीनंतर नवरात्रोत्सवात दुर्गामाता एक्सप्रेसची रेल्वे बोगी व रेल्वे स्थानकाची हुबेहूब प्रतिकृती साकारून आगळी-वेगळी आरास केली आहे. विठ्ठलनगर मधील हौशी तरुणांच्या कल्पनेतून साकारलेला कला अविष्कार पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

रेल्वेचा डब्बा बनविण्यासाठी प्लायवूड, पॅकींगसाठी येणार्‍या बॉक्सचा पुठ्ठा, पीव्हीसी पाईप, लाईट फिटिंगचे पाईप, घरगुती दांड्या अशाप्रकारच्या सामानाची जमवाजमव करून रेल्वीची एक बोगी तयार करण्यात आली. त्यामध्ये पुठ्ठ्याचा वापर करून बसण्यासाठी बाकडेही तयार करण्यात आले. या रेल्वे बोगीला कापडाचे अवतरणे लावून त्यावर चंदेरी रंगाचे रंगकामही करण्यात आले. रेल्वे बोगीत उभ्या असलेल्या प्रवाशांना आधार म्हणून पकडण्यासाठी हातमुठी लावण्यात येऊन रेल्वे बोगीची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली. नुसते एवढ्यावरच न थांबता या रेल्वे डब्ब्यात जनजागृतीचे व सुरक्षिततेशी निगडीत असलेले रेल्वे प्रवासात मोबाईलवर बोलणे टाळा, दरवाज्यात उभे राहू नका, धुम्रपान करू नका, रेल्वे पटरी ओलांडून जावू नका असे अनेक विविध संदेश देण्यासही ही तरुण मंडळी विसरलेली नाही. त्यामुळेच विठ्ठलनगर मधील तरुणांनी साकारलेल्या या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version