। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप सणस मैदान पुणे येथे 1 ते 4 मे दरम्यान सब ज्युनियर मुले व मुलींसाठी पार पडली. रायगड जिल्ह्याने 2 सुवर्णपदके पटकावली. 38 किलोमध्ये दुर्पता सौद ऊर्फ छोटीने सातारा, जळगाव येथील बॉक्सर्सचा पराभव केला आणि अंतिम फेरीत पुणे शहराच्या मुलींचा पराभव करन तिने सुवर्णपदक जिंकले तसेच मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर म्हणून तिला सन्मानित करण्यात आले. दुर्पता पनवेल दगडी शाळेत सहावीमध्ये शिकत आहे. बॉक्सिंग प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांच्याकडे आणि माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते.
मुलांमध्ये सिद्धेश पावसे याने 61 किलो वजनी गटात अंतिम फेरीत मुंबई क्रीडापीठ अकोला आणि औरंगाबाद येथील बॉक्सर्सचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. आदई येथील रहिवासी सिद्धेश पावसे हे सिद्धार्थ वर्मा आणि अद्वैत शेंबवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.20 मे ते 25 मे दरम्यान बेल्लारी (कर्नाटक) येथे होणार्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन्ही बॉक्सरची निवड करण्यात आली आहे.